नवीन पनवेल महिला शहर संघटिका श्रीमती अपूर्वा प्रभु व नवीन पनवेल विभाग प्रमुख श्री किरण सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सदर मासळी विक्रेत्यांनी आपल्या मागण्या साठी पनवेल महानगर पालिकेवर मोर्चा
पनवेल/प्रतिनिधी:नवीन पनवेल आदई सर्कल येथे स्थानिक व आसपासचे भूमिपुत्र मासळी विकुन आपला चरितार्थ चालवतात। सद्य स्थितीत करोना साथी रोगा मूळे लोक बेजार व बेकार झाले असताना मासळी विक्री करून आपले व कुटुंबातील सदस्यांचे उदारनिर्वाहन करणाऱ्या ह्या लोकांना महापालिका फेरीवाला प्रतिबंधक पथकाच्या कारवाई मूळे अतिशय त्रास होत असे। आज दिनांक 04 डिसेंबर 2020 रोजी नवीन पनवेल महिला शहर संघटिका श्रीमती अपूर्वा प्रभु व नवीन पनवेल विभाग प्रमुख श्री किरण सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सदर मासळी विक्रेत्यांनी आपल्या मागण्या साठी पनवेल महानगर पालिकेवर मोर्चा नेला. या प्रसंगी श्री गुरुनाथ पाटील साहेब शिवसेना उपमहानगर संघटक पनवेल यांचे मोलाचे मार्गदर्शन व नेतृत्व लाभले. स्थानिक मासळी विक्रेत्यांचा प्रश्न तात्पुरता सोडवण्यात यश मिळाले व स्थानिक मराठी मासळी विक्रेत्यांना विक्री साठी हक्काची जागा उपलब्ध होण्यासाठी उपाययोजनांची सुरवात करण्यात आली त्या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी उपमहानगर संघटक श्री गुरुनाथ पाटील, त्यांचे सहकारी श्री गुप्ताजी, नवीन पनवेल महिला शहर संघटिका अपूर्वा प्रभू, नविन पनवेल विभाग प्रमुख श्री किरण सोनवणे, उप विभाग प्रमुख श्री राजेश वायंगणकर शिवसेनेचे कार्यकर्ते विकास कोळी, निकिता कोळी व इतर शिव सैनिक तसेच स्थानिक मासळी विक्रेते उपस्थित होते।