महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारने जनसेवेत समर्पित असे एक वर्ष नुकतेच पूर्ण केले त्याबद्दल शिवसहाय्य पनवेलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दि.13 डिसेंबर 2002 रोजी पुन्हा एकदा करण्यात आले आहे.
परंतु सध्या कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढल्याने महाराष्ट्राला रक्ताची चणचण भासत आहे. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब व्होकेशनल अवॉर्ड, 2020 ने सन्मानित शिवसहाय्य, पनवेल तर्फे दिनांक 13 डिसेंबर, 2020 (रविवार) रोजी पुन्हा एकदा रक्तदान शिबिराचे आयोजन तथास्तू हॉल पनवेल येथे सकाळी 9 ते 4 या वेळेत करण्यात आले आहे. यासाठी रक्त संकलन रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी त्यांचे नाव आणि त्यांच्या सोयीची वेळ प्रविण पोपटराव जाधव 9082243901, संकेत शिरीष बुटाला 993041899, राकेश अनिल टेमघरे 8108416579, डॉ. गौरव धरणीधर दवे 8988888425, सनी अनिल टेमघरे 8655197965, साईसुरज सुधाकर पवार 7506578392, सतीश कळमकर 9167055715, प्रसाद पटवर्धन, 9773390460, रवी पडवळ 9833217456, चेतन शेळके 9022398855, अॅड. अमर दिलीप पटवर्धन 9029527627 या कोणत्याही एका क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज द्वारे कळविले तर सोशल डिस्टनसिंग व अन्य निर्देशांचे पालन करत सदर रक्तदान शिबिर सुरळीतपणे पार पाडण्यास मोलाची मदत होईल. रक्तदात्यांनी न विसरता मास्क वा रुमाल लावून येणे, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.