स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकार्यांनी घेतले दादर चैत्यभूमीला जावून दर्शन
पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन यांच्या विद्यमाने रायगड जिल्याचे अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले, त्या वेळी पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच सर्व कार्यकर्ते व महेश हे पक्षप्रमुख मनोजभाई संसारे यांच्या सोबत दादर चैत्यभूमी ला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतले, व त्या ठिकाणी पक्षातर्फे मास्क, सॅनिटीझर चे वाटप करण्यात आले.
तसेच काही दिवसांपूर्वी विजयादशमी या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ कार्यक्रम घेण्यात आला होता तेव्हा महेश साळुंखे यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करते वेळी सांगितले होते की, बाबासाहेबांच्या पुतळ्याचे व तेथील परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी पक्षाच्या वतीने महानगरपालिकेकडे करण्यात आली होती लगेच त्यांनी त्याची दखल घेऊन पुतळ्याच्या सुशोभीकरण करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती पालिकेने दिली व त्या पुतळ्याचे प्रेझेंटेशन सुद्धा देण्यात आले त्यामुळे पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करत आहोत त्या वेळी उपस्थित रायगड जिल्याचे अध्यक्ष महेश साळुंखे, पनवेल शहर अध्यक्ष प्रकाश जाधव, युवा अध्यक्ष सागर जाधव, अविनाश अडागळे, सुनील गायकवाड, अतुल कांबळे, प्रणव गायकवाड, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.