गुरुद्वारा गुरुनानक दरबार नवीन पनवेल तर्फे शेतकर्यांच्या भारत बंद ला पाठिबा
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः दिल्ली येथे शेतकर्यांचे विविध मागण्यासाठी अनेक दिवस आंदोलन सुरु आहे, शेतकर्यांनी केलेल्या मागण्या वर भारत सरकार ला तोडगा काढण्यात अद्याप यश आले नाही शेतकर्याचा संयम संपत असून याच धर्तीवर आज भारत बंदची हाक देण्यात आली.
नवीन पनवेल येथील दुरुद्वारा गुरुनानक दरबार च्या वतीने नवीन पनवेल सर्कल येथे शेतकरी बांधवाच्या आंदोलनाला पाठींबाचे फलक हातात घेऊन दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शवत जय जवान जय किसान चा नारा दिला.
