लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र(रजि) 14 वर्धापनदिन उत्साहात साजरा
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र(रजि) या आपल्या सामाजिक संस्थेचा 14वा वर्धापन दिन (स्थापना दिवस) तसेच संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.श्री. स्वराज संजय सोनावणे यांचा वाढदिवस पनवेल येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. आजच्या या दुग्धशर्करा योग लाभलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अॅड. अरूण कुमार राज्याध्यक्ष बिहार ,यांनी भूषविले. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि वाढदिवस सत्कारमूर्ती स्वराज संजय सोनावणे यांनी लंडनहून व्हिडिओ द्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी डॉ.संजय अनुसया राजाराम सोनावणे, राष्ट्रीय अध्यक्ष, निलेश रामचंद्र सोनावणे, राष्ट्रीय उपाध्यक्ष (प्रशासन), अॅड. मनोज म्हात्रे ,राष्ट्रीय महासचिव, सौ. संजीवनी शिर्के ,राष्ट्रीय मुख्य संयोजक, डॉ.राजेश साखरे, मुख्य सल्लागार कोअर कमिटी, सचिन कांबळे ,सरचिटणीस कोअर कमिटी, नितीन जोशी,राज्य कार्याध्यक्ष, शरद राजाराम सोनावणे, राज उपाध्यक्ष, संजय कदम, राज्य सरचिटणीस, यशवंत बिडये, राज्य प्रमुख सामाजिक विभाग, श्रीमती शोभा सोनकांबळे, स्वीय सहाय्यक, इरफान तांबोळी, पनवेल तालुका अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम भगवान गौतम बुद्ध यांचे मुर्तीस कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. अरूण कुमार यांनी पुष्प अर्पण करून वंदन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस निलेश सोनावणे राष्ट्रीय उपाध्यक्ष (प्रशासन) यांनी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस अॅड. मनोज म्हात्रे राष्ट्रीय महासचिव यांनी पुष्पमाला अर्पण केली. तर सर्वश्री. नितीन जोशी, शरद सोनावणे, संजय कदम, डॉ.राजेश साखरे, सौ.संजीवनी शिर्के यांनी सामुदायिक दिप प्रज्वलन केले. कोअर कमिटी सरचिटणीस सचिन कांबळे यांनी शब्द सुमनांनी मान्यवरांचे हार्दिक स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वराज यांचा वाढदिवस केक आणि संस्थेच्या 14व्या वर्धापन दिनाचा केक राष्ट्रीयअध्यक्ष डॉ.संजय अनुसया राजाराम सोनावणे यांचे हस्ते कापून करण्यात आली. नंतर नितीन जोशी, यशवंत बिडये, संजय कदम, डॉ.राजेश साखरे, अॅड. मनोज म्हात्रे, सचिन कांबळे यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले. तसेच सौ.संजीवनी शिर्के, श्रीमती शोभा सोनकांबळे यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास डॉ.संजय अनुसया राजाराम सोनावणे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. अरूण कुमार यांनी थोडक्यात अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमात शंकर कांबळे, वाहन चालक यांनी सुंदर गाणे गायले. शेवटी इरफान तांबोळी यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.