इनरव्हील क्लब सामाजिक बांधिलकीद्वारे ज्येष्ठांना दिली फराळ व डायपर्सची भेट
पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी संस्था म्हणजे इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन. या इनरव्हील क्लबने नुकतिच शांतीवन येथील आधारघर, शांतीवन वृद्धाश्रम आणि कुष्ठरोग निवारण समिती यांना भेट देऊन तेथील निराधार वृद्धांसाठी फराळ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डायपर्स भेट दिले.
त्यावेळी तेथील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहर्यावरचे हास्य पाहून इनर व्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षा ध्वनी तन्ना यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी क्लबच्या अनेक सदस्य हेतल बालड, मौसमी गोगुला, वैशाली कटारिया, दृष्टी बालड उपस्थित होत्या.
