श्री साई देवस्थान साईनगर वहाळ व रोटरी क्लब ऑफ उलवे नोड तर्फे कोरोना योद्धा साई सन्मान सोहळा
पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः श्री साई देवस्थान साईनगर वहाळ व रोटरी क्लब ऑफ उलवे नोड तर्फे कोरोना योद्धा साई सन्मान सोहळा गुरुवार दि.10/12/2020 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
जागतिक महामारी कोरोनाच्या काळात ज्यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. त्यामध्ये पोलीस अधिकारी, डॉक्टर, नर्स, आशा सेविका यांना कोरोना योद्धा साई सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच रोटरीयन सुरज भगत यांनी लिहिलेल्या सक्सेस बुक या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉ.बी.जी.शेखर पाटील, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त सुरेश मेगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा विनोद चव्हाण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प सिडको मुख्य अभियंता राजेंद्र धायटकर, गर्व्हनर झोन 6 डॉ.प्रमोद गांधी, वपोनि एनआरआय सागरी पोलीस ठाणे रवींद्र पाटील, मध्यवर्ती गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, एनआरआय सागरी पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक माधव इंगळे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती साई देवस्थान साईनगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील व रोटरी क्लब ऑफ उलवे नोडचे प्रेसिडेंट शिरिष कडू यांनी दिली. सदर कार्यक्रम साई देवस्थान साईनगर वहाळ येथे संपन्न होणार आहे.