नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने फुटपाथवरील ड्रेनेजना झाकणे
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः नगरसेवक विक्रांत पाटील हे प्रभागातील विकास कामांच्या सोबत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. माझा प्रभाग,माझी जबाबदारी यानुसार नेहमीच कर्तव्य दक्ष पणे जनसेवेसाठी ते तत्पर असतात. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि सोयी उपलब्ध करून देणे ही नेहमीच त्यांची प्राथमिकता असते. प्रभाग 18 मधील सेक्टर 12 खांदा कॉलनी येथील नागरिकांनी फुटपाथ वरील ड्रेनेज झाकणं नसल्याचे नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. विक्रांत पाटील यांनी संभाव्य धोका लक्षात घेत तत्परता दाखवत दोन्ही ठिकाणी बॅरिकेट्स व पट्ट्या बांधून घेतल्या आणि सिडको च्या कार्यकारी अभियंत्याशी पाठपुरावा करून दोन्ही ठिकाणी त्वरित पाठपुरावा करून झाकणं टाकून घेतली.
नगरसेवक विक्रांत पाटील यांनी दाखवलेल्या तत्परते बद्दल सेक्टर 12 खांदा कॉलनीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करत धन्यवाद दिले आहेत.असे सातत्याने जनसेवेसाठी वाहून घेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारे नगरसेवक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.