पनवेल परिसरात शिवसेना व युवा सेनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात तसेच रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानांचा करण्यात आला निषेध
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पनवेल परिसरात आज ठिकठिकाणी शिवसेना व युवा सेनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात तसेच रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानाचा निषेध करण्यात आला.
पनवेल परिसरातील तळोजा फेज-1, कळंबोली, पनवेल शहर मध्यवर्ती कार्यालय, खारघर आदी ठिकठिकाणी शिवसेना व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच महिला आघाडी, ग्राहक संरक्षण कक्ष आदींच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात तसेच रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानाचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख शिरिष घरत व जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, उपमहानगरप्रमुख कैलास पाटील, महिला आघाडीच्या प्रमिला कुरघोडे, अर्चना कुळकर्णी, गावडे, शहरप्रमुख अच्युत मनोरे, विश्वास म्हात्रे, अनिलकुमार कुळकर्णी, बाळा मुंबईकर, नितीन पाटील, गणेश म्हात्रे, कृष्णकांत कदम आदींसह इतर पदाधिकार्यांनी पनवेल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र सरकारचा निषेध केला.