तळोजा औधोगिक वसाहत येथून मद्यासह ट्रकची चोरी
पनवेल दि.13 (वार्ताहर)- मद्य भरून ठेवलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तळोजा पोलिस ठाण्यात घडली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील बॉंबे बियर येथे 5 लाख 38 हजार रूपयांची दारू बॉक्स मोहम्मद युनुस गालिब शेख यांनी त्यांच्या ट्रकमध्ये भरले होते व सदर ट्रक त्यांनी उघड्या पार्किंगमध्ये उभा करून ठेवला होता. त्यानंतर ते कामानिमित्त बाजूला गेले असता अज्ञात चोरट्यांनी सदर ट्रक पसार केला आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.