शहबाज पटेल यांच्या वाढदिवसाला सामाजिक स्वरूप
गोरगरिबांना अन्न त्याचबरोबर ब्लँकेट वाटप
राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल दि.13 (वार्ताहर)-राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज फारूक पटेल यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पटेल यांचे तळोजा या ठिकाणी अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष फारुक पटेल यांचे शहबाज हे चिरंजीव आहे. समाजकारण राजकारणाचे बाळकडू लहानपणापासूनच त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि खासदार शरद पवार यांचा विचारांचे संस्कार शहबाज पटेल यांच्यावर सुरुवातीपासूनच झालेले आहेत. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ युवा कार्यकर्ता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पटेल यांनी तळोजा परिसरात अनेक समस्यांना वाचा फोडली आहे. वेळप्रसंगी सिडको विरोधात आंदोलन करून प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. एक हरहुन्नरी कार्यकर्ता म्हणून त्यांची पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ओळख आहे. शहबाज पटेल यांचा दांडगा जनसंपर्क सुद्धा आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. तळोजा याठिकाणी संपन्न झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, रायगड जिल्हा प्रवक्ते प्रशांत पाटील, सूरदास गोवारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पनवेल शहर जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल, सातारा युवक राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदे, राष्ट्रवादी पनवेल जिल्हा उपाध्यक्ष, प्राचार्य बी. ए .पाटील आजिनाथ सावंत, खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना अन्न वाटप करण्यात आले. त्याचबरोबर त्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून ब्लँकेट वाटप सुद्धा करण्यात आले.
कोट
पनवेल परिसरात शहबाज फारूक पटेल हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या मजबुतीकरणासाठी अत्यंत चांगले काम करीत आहेत. जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल यांच्या हातात हात घालून या भागात युवकांची फळी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करीत आहेत. याशिवाय सर्वसामान्यांचे प्रश्न थेट शासन दरबारी पोचवण्याचे काम सुद्धा ते करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पनवेल भागात अधिक बळकट झाल्याशिवाय राहणार नाही.
मेहबूब शेख
प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस