खारघर च्या रिक्षा चालकांना स्टीमर व मास्क चे वाटप रोटरी क्लब चा उपक्रम
पनवेल दी 15 ( वार्ताहर)खारघरयेथील सुमारे 300 रिक्षा चालकांना 300 स्टिमर आणि 600 मास्क चे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम खारघर रेल्वे स्थानक आणि भवानी मंदिर, सेक्टर २१, खारघर येथे संपन्न झाला.रिक्षा चालक युनियन चे सेक्रेटरी किसन म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. मास्क वाटप कार्यक्रमाची त्यांनी प्रशंसा करत असेच उत्तम कार्यक्रम आयोजित करा असे प्रोत्साहन दिले.रोटरी क्लब च्या सदस्यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.सदर कार्यक्रम रोटरी खारघर मिड टाऊन ( अध्यक्ष कमलेश अगरवाल) , रोटरी नवी मुंबई सन राइस ( अध्यक्ष चंद्रशेखर के वी), इंनर व्हील क्लब ऑफ नवी मुंबई सन राइस ( अध्यक्ष शिला श्रीवास्तव) यांच्या सहकार्याने संपन्न झाला.रोटरी खारघर चे अध्यक्ष कमलेश अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.