सख्या काकाने केला पुतणी वर लैंगिक अत्याचार
पनवेल दिनांक 15 (वार्ताहर) सख्या काकाने आपल्या राहत्या घरी असलेल्या गेस्ट रूममध्ये पीडित मुलीस जबरदस्तीने वारंवार नेऊन तिची अंतर्वस्त्र काढून तिच्या गुप्तांगात वारंवार हाताची दोन बोटे घालून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार सदर पीडित मुलीच्या आईने तळोजा पोलीस स्थानकामध्ये केली आहे.
चांद पापा उर्फ चांद मुस्ताक अन्सारी याने त्याच्या राहत्या घरी असलेल्या गेस्ट रूम मध्ये पाच वर्षीय पीडित मुलीला वारंवार बोलावून तिच्या वर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.