फुटपाथवर पडून डोक्यास मार लागल्याने एका इसमाचा मृत्यू
पनवेल दिनांक 16 (वार्ताहर )कळंबोली येथे बस स्टॉप जवळ फूटपाथ वर पडून डोक्यास मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.याप्रकरणी कळंबोली पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
सीमांत रोगाई नेपाळ वरून रत्नागिरी येथे जाण्यासाठी कळंबोली बस स्टॉप जवळ उभा असताना फुटपाथवर पडल्याने त्याच्या डोक्यास मार लागला यात त्याचा मृत्यू झाला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध कळंबोली पोलिस करीत आहेत या संदर्भात कोणाला अधिक माहिती असल्यास दूरध्वनी २७४२३००० किंवा पोलीस उपनिरीक्षक बळीराम घंटे यांच्याशी संपर्क साधावा