सौ. कमला एकनाथ देशकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेने केले नामंजूर : एकनाथ देशेकर यांनी दाखवली आपली ताकद
पनवेल दि.16 वार्ताहर:चिंध्रण ग्रामपंचायतीचे सरपंच सौ कमला एकनाथ देशकर यांच्या विरोधात भाजप,शेकप व शिवसेना या तीन पक्षाच्या आठ सदस्यांनी अविश्वासाचा ठराव मांडला होता. या अनुषंगाने पनवेलचे नायब तहसिलदार संजय मांडे व ग्रामसेविका वंदना अहिरे यांच्या उपस्थितीत दिनांक 15 डिसेंबर रोजी चिंध्रण ग्रामपंचायत कार्यालयात गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक पार पाडली. या निवडणुकीमध्ये चिंध्रण गावातील मतदारांनी गुप्त मतदान केले. एकूण 1351 मतदान झाले. त्यामध्ये 23मत बाद ठरविण्यात आली. विरोधकांच्या बाजूने 653 मतदारांनी मतदान केले. सौ. कमला एकनाथ देशकर यांना 675 मतदरांनी मतदान केले. 22 मतांनी सरपंच सौ. कमला एकनाथ देशकर यांनी अविश्वास ठराव जिंकला. सौ. कमला एकनाथ देशकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेने नामंजूर केले. केला.
लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी तालुक्यात केलेल्या विकास कामावर विश्वास ठेवून व चिंध्रण गावातील विकास कामे पाहून पुन्हा एकदा चिंध्रण गावातील मतदारांनी चिंध्रण ग्रामपंचायतीचे भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार सौ. कमला एकनाथ देशकर यांना निवडूण देवून गावाचा विकास करण्याची संधी दिली असल्याचे सौ. कमला एकनाथ देशकर यांनी म्हटले आहे.
पुन्हा एकदा चिंध्रण गावातील मतदारांनी सौ कमला एकनाथ देशकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांनाच पुन्हा एकदा सरपंच पदासाठी निवडूण देवून विरोधी सदस्यांना एक चपराक दिली आहे.
ज्या भापजच्या सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला त्या सदस्यांना भाजपातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती एकनाथ देशेकर यांनी दिली आहे.सौ. कमला एकनाथ देशकर सरपंच
ज्या सदस्याना 2017 च्या थेट सरपंच पदाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत एकनाथ देशेकर यांचा चेहरा पाहून गावातील सदस्यांना मतदारांनी निवडूण दिले होते. त्याच सदस्यांनी विरोधकांना सोबत घेवून आमच्या विरूद्ध अविश्वास ठराव मांडला. हा अविश्वास ठराव तब्बल 22 मतांनी जिकून एकनाथ देशेकर यांनी आपल्या नेतृत्वाखाली सौ कमला एकनाथ देशकर यांना निवडूण आणुन आपली ताकद विरोधकांना दाखवून दिली आहे.लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माग॔दशनाखाली पुन्हा एकदा चिंध्रण ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.सौ. कमला एकनाथ देशकर यांचा विजय हा जनतेने दिलेला आशिर्वाद आहे. विरोधकांना जनतेने दिलेली हि एक चपराक आहे. विरोधकांना एकनाथ देशेकर यांचा चेहरा पाहून गावातील नागरिकांनी निवडूण दिले होते. त्या सव॔ भाजपच्या सदस्यांना भाजप पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.एकनाथशेठ देशेकर, अध्यक्ष रायगड जिल्हा ओ.बी.सी. सेल