अवैध गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यसाठा जप्त
पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.2, पनवेल यांना खात्रीलायक बातमी मिळाल्यानुसार मौजे घर नं. 59 अ, मधली आळी, पोटदुखी माता मंदिर जवळ, कोप्रोली, ता.पेण, जि.रायगड येथे छापा घालत असताना गोवा राज्य निर्मित हायर्वडस फाईन व मॅकडॅविल्स व्हिस्की मद्याच्या सिलबंद बाटल्या मिळून आल्या. महिला आरोपी हेमलता शशिकांत म्हात्रे वय 43 वर्षे, घर नं.59 अ मधली आळी, पोटदुखी माता मंदिरा जवळ, कोप्रोली, ता.पेण, जि.रायगड हिला जागीच अटक करुन अवैध गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याच्या व्हिस्कीचा साठा 750 मि.ली.क्षमतेच्या 58 बाटल्या व 180 मि. ली. क्षमतेच्या 272 रुपये 59,860/- किमंतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई कांतीलाल उमाप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, श्रीमती. उषा राजेंद्र वर्मा संचालक (अंमलबजावणी व दक्षता) राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र् राज्य मुंबई, श्री. सुनिल चव्हाण विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग ठाणे, श्रीमती. किर्ती शेडगे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड- अलिबाग, विश्वजीत देशमुख उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड-अलिबाग, यांचे मार्गदर्शनाखाली एस. एस. गोगावले (निरीक्षक), आनंद पवार (निरीक्षक), एस.एस. गायकवाड (दुय्यम निरीक्षक), ए. सी. मानकर (दुय्यम निरीक्षक), श्रीमती. निलम घुट्टे (दुय्यम निरीक्षक) तसेच पालवे, सुधीर मोरे, श्रीमती. मायाक्का मोरे, संदीप पाटील, हाके (जवान-नि-वा. चालक) यांनी भाग घेतला. तसेच सोबत मनोज अनंत भोईर व अनंत दत्तु जगदाडे यांनी मदत केली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती. किर्ती शेडगे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांचे मार्गदर्शनाखाली ए. सी. मानकर दुय्यम निरीक्षक हे करत आहेत.