पर्यावरण संवेदनशील “वाढवण बंदर” प्रकल्पाला स्थानिकयांच्या विरोधाला ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियनचा पाठिबा – श्री.संजयजी पवार
नवी मुबंई:(वार्ताहर) सन १९९१ पासून डहाणू तालुक्याला ‘पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील’ (इकॉलॉजिकली सेन्सेटिव्ह) क्षेत्र घोषित आहे. वाढवण बंदराला स्थानिक मच्छिमार पूर्ण विरोध करत आहेत. पर्यावरण संवेदनशील तालुका डहाणू, जिल्हा पालघर १६ वर्षापूर्वी सुद्धा या बंदर उभारणी प्रकल्पविरोधात जनक्षोभ उसळल्याने, शिवसेनाप्रमुख बाळसाहेबाच्या आदेशानुसार राज्य सरकारला हा प्रकल्प स्थगित करावा लागला होता.
पाच हजार एकर क्षेत्रावर भराव टाकून समुद्रामध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे समजते. यामुळे या परिसरातील स्थानिकांचे शेती-बागायती, मासेमारी, तसेच डायमेकिंग सारख्या पारंपरिक व्यवसायलाही याची झळ बसेल व त्यामुळे सुमारे एक लाख कुटुंबे उद्ध्वस्त होतील. येथील पर्यावरण आणि जैवविविधता धोक्यात येणार आहे. बरेच प्रजातींचे मासे प्राजन्नासाठी याच भागाला पसंती देत असल्यामुळे भविष्यात अशा माशांच्या प्रजोत्पादन तसेच आगामी काळात त्यांच्या उपलब्धतेवर परिणाम होवू शकतो.
आम्ही यूनियन च्या माध्यमातून या प्रकल्पाला स्थानिकांचा असलेल्या विरोधामुळे तातडीने स्थगित करण्याची मागणी करत आहोत. व लवकरात लवकर रद्द करण्यात यावा ही विनंती युनियन चे अध्यक्ष संजय पवार कार्याध्यक्ष अभिजित सांगळे , फिशर मॅन सेल अध्यक्षा शितल मोरे , पालघर जिल्हा अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून बंदरे व मत्स्यपालन मंत्री अस्लम शेख , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , व पालघर जिल्हा पालकमंत्री दादा भुसे यांचा कडे करण्यात आली