भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली संभाजी नगर इथे भारतीय जनता युवा मोर्चाचे जोरदार निर्दशने
पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरुद्ध संभाजीनगर क्रांती चौक इथे जोरदार निदर्शने करण्यात आले.
नोकरीचे आमिष दाखवून ट्युशन घेणार्या महिलेवर नराधम मेहबूब शेख याने बलात्कार केला.राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा प्रदेशाध्यक्ष पदी असलेला मेहबूब शेख याच्या या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला.महिलांच्या वर होण्यार्या अत्याचारा विरुद्ध शक्ती कायदा बनवणार्या सरकारला आपल्याच गृहमंत्रीच्या पक्षाच्या पदाधिकारी विरुद्ध या कायद्याची अंमलबजावणी करण्याची नामुष्की येणार आहे.महिना होऊन गेला तरी या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी विरुद्ध गुन्हा नोंदवायला पोलीस टाळाटाळ करत होती.शेवटी दोन दिवसापूर्वी गुन्हा दाखल झाला आणि याची वाच्यता झाली.आपल्या तडाखेबंद भाषणात त्यांनी या म्हाबिघाडी सरकारची लक्तरे वेशीवर टांगली.आज आपल्या महराष्ट्रात महिला सुरक्षित राहिल्या नाहीत.हॉस्पिटलमध्ये,कोविड सेन्टर आणि आतातर भर वस्तीत महिलांच्या वर बलात्कार होत आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणार्यां या सत्ताधार्यांनी महाराष्टातील आयाबहिणींची आब्रू वेशीवर टांगायला घेतली आहे.सर्व स्तरावर हे महाबीघाडी सरकार अपयशी ठरली आहे.कुठल्याही ठोस उपाययोजना नाही की बलात्कार सारख्या गुन्ह्यावर गुन्हेगाराला कठोर शासन नाही.फक्त फुशारक्या मारण्यातच यांचा वेळ जातोय.जो पर्यंत पीडित महिलेला न्याय मिळत नाही आणि मेहबूब शेख या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्याला अटक होऊन कठोर शासन होत नाही तो पर्यंत भारतीय जनता युवा मोर्चा हे आंदोलन यापुढें सुरूच ठेवणार असल्याचं भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी तीव्र शब्दात आपली भावना व्यक्त केली.गृहमंत्री अनिल देशमुख आणि सुप्रियाताई सुळे पीडितेला न्याय मिळवून देणारा की आपल्या आपल्या पदाधिकार्याची पाठराखण करणार असा सवाल विक्रांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.प्रदेश सरचिटणीस भाजप,प्रभारी भाजयुमो मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे या आंदोलनाला विशेष मार्गदर्शन लाभले.या आंदोलनाच्या वेळी नागरीक,युवा मोर्चा चे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि भाजप महिला मोर्चाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.