महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे हददीमध्ये मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातामध्ये मृत्युचे प्रमाण 40% नी कमी झाले.
पनवेल, दि.2 (संजय कदम) ः मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर होणा-या अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याने विहीत मयदिपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणा-या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पळस्पे पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी अंमलदार यांनी कंबर कसली असल्याने द्रुतगती महामार्गावर अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण 40% नी कमी झाले आहे.
राज्यातील महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता डॉ. भुषणकुमार उपाध्याय अपर पोलीस महासंचालक वाहतुक महाराष्ट्र राज्य मुंबई, यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे श्रीमती. सुनिता साळुंखे – ठाकरे, पोलीस अधीक्षक (मुख्यालय) व डॉ.दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र ठाणे, संजय बारकुंड पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र तसेच सुदाम पाचोरकर पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सुभाष पुजारी, महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर होणा-या अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याने विहीत मयदिपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणा-या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पळस्पे पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी अंमलदार यांनी कंबर कसली असुन अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांचे आदेशाप्रमाणे चालकांचे प्रबोधन व बेशिस्त चालकांवर कारवाई अशी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सन 2020 मध्ये इंटरसेप्टर वाहनादूवारे व मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वेगवेगळया ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामार्फत अतिवेगाने वाहन चालविणा-या 41738 वाहनांवर कारवाई करण्यात आली व सीट बेल्ट न लावणे , मोबाईल संभाषण, लेन कटींग, काळया काचा, रिफलेक्टर नसलेल्या वाहनांवर तसेच इतर मो.वा.का.कलमाअंतर्गत 64286 वाहनांवर कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे सन 2020 मध्ये म.पो.केंद्र पळस्पे मार्फत एकुण 106024 वाहन चालकांवर चलनादवारे कारवाई करण्यात आलेली आहे.
तसेच महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे अधिकारी व अंमलदार यांचेकडुन वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणा-या दंडात्म्क कारवाई तसेच वाहन चालकांचे करण्यात आलेल्या प्रबोधनामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर प्राणांतीक अपघातामध्ये सन 2020 मध्ये सन 2019 पेक्षा 40 % पेक्षा अपघात कमी झालेले दिसुन येत आहेत. म.पो.केंद्र पळस्पेचे वतीने वाहनचालकांकरीता माहे जानेवारी 2020 मध्ये आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आलेले होते. सदर शिबीरामध्ये मधुमेह, रक्तदाब, फुप्फुसांचे आजार, हाडांमधील कॅलशिअम चे प्रमाण, हिमोग्लोबिन, इ.सी.जी, थायरॉईड इत्यादी तपासणी होवून सुमारे 300 अधिकारी कर्मचारी व 200 वाहन चालक/क्लिनर यांना तात्काळ अहवाल देण्यात आले.
तसेच कोरोना संसर्ग काळामध्ये काळात महामार्ग केंद्राच्या वतीने महामार्ग पोलीस अंमलदारांना तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलातील कर्मचारी व देवदुत कर्मचारी आणि वाहनचालकांना सॅनीयायझर्स, मास्क शिल्ड, हॅन्डग्लोव्हज यांचे मोठया प्रमाणात वाटप करण्यात आले. महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे कडुन अपघात कमी व्हावे तसेच वाहनचालकांमध्ये वाहतुक नियम व नियमनाबाबत जनजागृती व्हावी याकरीता वेळोवेळी चौक सभा आयोजीत करुन वाहन पार्किंग स्थळे, कळंबोली ट्रक टर्मीनल, लॉजीस्टीक्स , खालापुर टोलनाका येथे कार्यकम घेवुन वाहतुक नियमांबाबतच्या माहितीबाबतची एका वर्षात 75000 पत्रके वाटण्यात आली. वाहतुक नियंमांचे उल्लंघन केल्यामुळे होणा-या अपघाताबाबत माहिती देवुन अपघातसमयी मदत करण्याबाबत सुचना करण्यात येतात.
कोट
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाताचे व अपघातातील मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा विशेष मोहिम राबविण्यात येते. वेगमयदिचे उल्लंघन करणा-या व लेन कटींग करणा-या वाहनचालकांवर मोठया प्रमाणात कारवाई बरोबर प्रबोधन सुदधा करण्यात येते.
डॉ. भुषणकुमार उपाध्याय
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक )
महाराष्ट्र राज्य , मुंबई
कोट
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर कारवाई करुन प्रबोधन करण्यात येते. महामार्गावर गस्त मोठया प्रमाणात वाढविण्यात आली असुन अपघाताचे ठिकाणी तात्काळ मदत पोहचविली जाते.
संजय बारकुंड
पोलीस अधीक्षक
महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र
कोट
वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणा-या दंडात्म्क कारवाईबाबतची माहीती देवुन वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येत असते असे महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे सहा.पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सांगितले.
सुभाष पुजारी
सहा.पोलीस निरीक्षक
महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे