अवैध गॅरेजवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल, दि.3 (वार्ताहर)- खारघर वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गॅरेज व्यवसाय सुरू झाले असून यामुळे पादचाऱ्यांना चालणे मुश्लिकीचे बनले आहे. तसेच या गॅरेजच्या समोर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीसुद्धा होत असल्याने अशा गॅरेजवर व मालकांवर वाहतूक शाखेने कारवाई करावी अशी मागणी पनवेल शिवसेना तालुका महानगर समन्वयक गुरूनाथ पाटील यांनी केली आहे.
खारघर वसाहतीमधील से.-21 येथील गीतांजली सोसायटी व विद्याधन सोसायटी तसेच परिसरातील अनेक भागात दुचाकी व चारचाकी दुरूस्तींचे, सजावटीचे व विक्रीचे गॅरेज मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले आहेत. याचा त्रास परिसरातील नागरिकांना व प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. अनेकवेळा येथे होणारी भांडणे व कलकलाट त्यामुळे येथील रहिवाशांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. तरी या अवैध गॅरेजवर खारघरवाहतूक शाखेने कारवाई करून सदर गॅरेज बंद करावेअशी मागणी पनवेल शिवसेना तालुका महानगर समन्वयक गुरूनाथ पाटील यांनी केली आहे. फोटोः पनवेल शिवसेना तालुका महानगर समन्वयक गुरूनाथ पाटील वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देताना