सोनसाखळी खेचून इसम पसार
पनवेल,दि.3 (वार्ताहर)- पायी चाललेल्या एका इसमाच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पसार झाल्याची घटना नवीन पनवेल परिसरात घडली आहे.नवीन पनवेल से.-10 येथे राहणारे महेश राऊत हे आपल्या घरी पायी जात असताना अचानकपणे त्यांच्यासमोर एक इसम येऊन त्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून तो झोपडपट्टीच्या गल्लीत पसार झाला आहे. याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.