नगरसेविका सिताताई पाटील यांना मातृशोक
शांताबाई रामचंद्र टेंभे यांचे वृद्धापकाळाने निधन
पनवेल/ प्रतिनिधी:- पनवेल महानगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका सिताताई सदानंद पाटील यांच्या मातोश्री शांताबाई रामचंद्र टेंभे यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्या 87 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पाठीमागे दोन मुली, एक मुलगा, सून, जावई सदानंद पाटील यांच्यासह नातवंडे,परतवंडे असा मोठा परिवार आहे.
खांदा गाव येथील मूळ रहिवासी असलेल्या शांताबाई यांचे पती रामचंद्र टेंभे यांना लवकरच देवाज्ञा झाली. त्यानंतर त्यांनी आपला मुलगा आणि मुलींचा सांभाळ केला. त्यांचे योग्य पद्धतीने पालन-पोषण केले. आपल्या मुलगा मुलींची आई बरोबरच वडिलांची ही जबाबदारी त्यांनी पार पाडली. शांताबाई टेंभे या संवेदनशील, प्रेमळ होत्या, त्यांचा सडेतोड स्वभाव होता. आपली मुलगी सिताताई पाटील या नगरसेव…