सुरू होणार असलेल्या कोविड रुग्णालयाची प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष श्री. बबनदादा पाटील ह्यांनी पाहणी केली
पनवेल/प्रतिनिधी:आज कळंबोली येथे “दि बा पाटिल प्रकल्पग्रस्त समितीने” केलेल्या मागणीनुसार सुरू होणार असलेल्या कोविड रुग्णालयाची प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष श्री. बबनदादा पाटील ह्यांनी पाहणी केली. ह्या हॉस्पिटलमधील सुविधा आणि करण्यात येणार असलेल्या उपाययोजनांचा सिडकोच्या अधिकार्यांसह आढावा घेतला..
लवकरच सिडकोचे MD श्री. मुखर्जी साहेब ह्यांची भेट घेऊन इस्पितळ व रुग्णांच्या इतर सोयसुविधांबाबत प्रकल्पग्रस्त समिती चर्चा करणार आहे.
लवकरच प्रकल्पग्रस्त समिती सोबत चर्चाकरून सदर इस्पितळाला वंदनीय स्वर्गीय दि. बा. पाटील साहेब ह्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणीही सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, सन्माननीय नगरविकासमंत्री, सिडको तसेच महापालिकेकडे करणार असल्याचे प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष श्री. बबनदादा पाटील ह्यांनी सांगितले..