डिलेव्हरी बॉयच्या बॅगेतील माल केला लंपास
पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः पार्सल पिकअप करण्याकरिता कामोठे येथे अॅक्टीव्हा मोटार सायकलवरुन आलेल्या डिलेव्हरी बॉयच्या बॅगेत असलेल्या पार्सल वस्तू बॅगेसहीत अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
रिंकी अरविंद शिंदे (26) या डिलेव्हरी बॉयच्या बॅगेमध्ये देण्यासाठी असलेले 8097 रुपये किंमतीची पार्सले अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या अॅक्टीव्हा मोटार सायकलला असलेल्या बॅगेतून काढून ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.