आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून संभाव्य तीव्र पाणीटंचाईची चाहूल नागरिकांना पनवेल महानगरपालिका सत्ताधाऱ्यांनी नागरिकांची थट्टा केली आहे….. शिवदास कांबळे
पनवेल/वार्ताहर :पनवेल महानगर पालिकेच्या वतीने सोमवार दिनांक 11 जानेवारीपासून पनवेल शहरातील पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे महापालिका स्थापनेनंतर चार वर्षांमध्ये पाण्यासारख्या समस्या वरती सत्ताधारी पक्ष कोणताही तोडगा आजपर्यंत काढू शकलेली नाही व व संभाव्य तीव्र पाणीटंचाईची शक्यता महापालिकेने नागरिकांना करून दिलेली आहे विकासाकडे झेपावणाऱ्या पनवेल शहरांमध्ये कोणताही आमूग्राही बदल महापालिका स्थापनेनंतर झालेल्या नाही किमान पाणी मिळावं अशी माफक इच्छा असणाऱ्या पनवेलकर यांचा अपेक्षाभंग झालेला आहे …शिवदास कांबळे
माजी नगरसेवक
कार्यकारी जिल्हाध्यक्ष पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी