देशी दारू विकणाऱ्यांवर कारवाई
पनवेल दि.10 (वार्ताहर)- देशी दारू विकणाऱ्यांवर पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई करीत मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वपोनि रविंद्र दोंडकर यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की, पोयंजे गावाच्या हद्दीतील नाना दूध डेअरीजवळ दोन इसम बेकायदेशीररित्या गावठी दारू विकत असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक कारोटे, पोलिस हवालदार भूमकर, गायकवाड, पो.ना. मेहेर आदींच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून जवळपास 2300 रू. किंमतींच्या मुद्देमालासह दोघांविरूद्ध कारवाई केली आहे.