पनवेल महापालिकेच्या नगरसेविका रुचिता लोंढे यांचा नगरसेवक पदाला १ वर्ष पुर्ण,अनेक सामाजिक कार्य आणि त्यातून नागरीकांच्या समस्या सोडविण्यायाचे काम केले
पनवेल / प्रतिनिधी: पनवेल महापालिकेच्या नगरसेविका रुचिता लोंढे यांचा नगरसेवक पदाला १ वर्ष पुर्ण झाला आहे. या एक वर्षाच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्य आणि त्यातून नागरीकांच्या समस्या सोडविण्यायाचे काम केले. तसेच त्यांनी कोरोना महामारीच्या काळातही अनेकांना मदतीचा हात पुढे करत सेवाकार्य केले. त्यांनी वर्षभरात केलेल्या या कार्याचा ‘भरारी दृष्टीक्षेप २०२०-२१’ हा कार्य अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याप्रमुख उपस्थितीत रविवारी प्रकाशन करण्यात आले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या वर्षापुर्तीनिमीत्त रुचिता लोंढे यांच्या माध्यामातून करण्यात आलेल्या कामाचा ‘भरारी’ हा कार्यअहवाल प्रकाशित झाला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, ऍड मनोज भुजबळ, नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, ज्येष्ठनेते श्रीनंद पटवर्धन, एकनाथ भोपी, गुरुनाथ लोंढे, नंदाजी ओझे, सुजाता ओझे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांथ ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर आणि नगरसेवक राजू सोनी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन रुचिता लोंढे यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.