सोफ्याची विक्री पडली 96 हजाराला
पनवेल दि.10 (वार्ताहर)- ओएलएक्स अपवर विक्रीस टाकलेला सोफा खरेदी करणाऱ्या इसमाने त्यांची फसवणूक तो सोफा विक्रेत्याला 96 हजारांचा भुर्दंड पडल्याने याबाबतचीतक्रार कळंबोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
रिया दास (रा.-रोडपाली) यांच्या घरातील सोफा विकण्याकरीता ओएलएक्स अपवर त्यांनी फोटो आणि किंमत अपलोड केली होती. दरम्यानच्या काळात त्यांचा सोफा विकत घेण्यासाठी एक फोन आला. यावेळी समोरील व्यक्तीने गुगल पे ला लिंक असलेला मोबाईल क्रमांक पाठविण्यास सांगितले. त्यानंतर त्याने क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करण्यास सांगितले. क्यूआर कोड स्कॅन केला असता अकाऊंटमधील पैसे जातील असे दास यांनी समोरील व्यक्तीला विचारले. यावेळी पैसे कट होणार नाहीत तर परत येतील असे दास यांना सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दास यांनी गुगल पे या अपमधून क्…