राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंध व्यक्तींना आर्थिक मदत.
पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष मा.श्री. जितेंद्र खानविलकर उर्फ जितुकाका यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवलदादा यांच्या संकल्पनेतून “नॅशनल फेडरशन ऑफ विजूअल इम्प्याड पर्सन “या बदलापूर – वांगणी येथील अंध व्यक्तींच्या संस्थेला आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी जितुकाका यांचा वाढदिवस अंध व्यक्तींच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. सदर अंध व्यक्ती या रेल्वेमध्ये कटलरीचे सामान विकुन आपला उदरनिर्वाह करीत असत मात्र लॉकडाऊननंतर रेल्वे बंद असल्याने त्यांचा व्यवहार ठप्प झाला व त्यांच्यावर आर्…