पनवेलच्या डॉ प्रभाकर पटवर्धन रुग्णालयात नवीन मॉड्युलर ओ टी, 6 बेडेड ICU आणि वाढीव डायलिसिस मशीन चे “रुग्णार्पण”…
पनवेल/प्रतिनिधी: गेली जवळपास 20/22 वर्षे डॉ प्रभाकर पटवर्धन स्मृती धर्मादाय रुग्णालय पनवेल आणि नजीकच्या परिसरातील जनतेला माफक दरात उत्कृष्ट रुग्णसेवा देत आहेत. रुग्णालयात अन्य सोयी सुविधां सोबतच 7 डायलिसिस मशिन्स वर 3 शिफ्ट मध्ये किडनी च्या रुग्णांना अत्यल्प दारात गेली अनेक वर्षे सेवा देणे सुरू आहे तसेच गेली 2 वर्षे 3 बेडेड ICU सेवा रुग्णालया मार्फत अगदी माफक दरात दिली जात आहे.
किडनी विकाराचे वाढते रुग्ण बघता रुग्णालयाने अजून 3 डायलिसिस मशिन्स वाढवण्याचा निर्णय घेतला तसेच ICU पेशंट चा भार बघता ICU चे अजून 3 बेड वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच पनवेल शहरात कुठेही नसलेले स्टेट ऑफ द आर्ट मॉड्युलर ऑपरेशन थिएटर ज्यामुळे क्रिटिकल सर्जरी पनवेल मधेच माफक दरात करता य…