चायनिज गाडीवरील देशी विदेशी मद्यसाठा हस्तगत
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः बेकायदेशीररित्या चायनिज गाडीवर देशी-विदेशी मद्यसाठ्याची विक्री करणार्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील यांनी जोरदार मोहिम सुरू केली असून त्या अंतर्गत त्यांनी अशाप्रकारच्या गाड्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
दिवाळे गावातील व्यायाम शाळेजवळ असलेल्या दर्याकिनारा चायनिज सेंटरमध्ये बेकायदेशीररित्या देशी-विदेशी मद्यसाठा करून विक्री केली जात असल्याची माहिती वपोनि अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.रवींद्र अहिरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन सागळे, पो.हवा.परदेशी, पो.ना.राहूल सुर्यवंशी आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्या ठिकाणी जवळपास 1160 रुपये किंमतीचा मद्यसाठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी उदय जोशी याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
