श्री क्लिनीक परिसरात आढळला मृतदेह
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः पनवेल जवळील वडघर रोडवर असलेल्या श्री क्लिनीक जवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
मयत इसमाचे नाव लखन विश्वकर्मा (50 ते 55 वर्ष), उंची 5 फूट, रंग गहुवर्णीय, नाक सरळ, चेहरा उभट, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढीचे केस काळे पांढरे असून अंगात पांढर्या रंगाचा बारीक चौकटी असलेला फुल बाह्याचा शर्ट व क्रिम रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे. या इसमाच्या नातेवाईकांसदर्भात कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा सहा.पो.नि.राजेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधावा.