हरविलेल्या 4 वर्षीय मुलाला पोलिसांनी शोधून काढून दिले पालकांच्या ताब्यात
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः कामोठे वसाहत परिसरात हरविलेल्या चार वर्षीय मुलाला पोलिसांनी शोधून काढून तात्काळ मुंडेकर कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यावर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
कामोठे वसाहतीतील सेक्टर 12 गगनगिरी सोसायटी येथे राहणार्या मुंडेकर कुटुंबियांचा 4 वर्षीय मुलगा उदय हरविल्याने त्यांनी याबाबत तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात देताच वपोनि संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुरवाडे, पोलीस हवालदार होवाळ बीट मार्शल 3 वरील अमलदार पोलीस नाईक म्हात्रे व पोलीस नाईक पवार व पोलीस नाईक भोई, महिला पोलीस अंमलदार भोर यांनी हरविलेला उदयचा शोध घेण्यास सुरूवात केली. खास खबर्यांमार्फत तसेच इतर नागरिकांच्या सहकार्याने सदर हरविलेला मुलगा सेक्टर 21 प्लॉट नंबर 45, 46 कामोठे येथे असल्याची माह…