खारघर परिसरातून रिक्षाची चोरी
पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः खारघर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका रिक्षाची चोरी केल्याची घटना घडल्याने वाहन चालकांमध्ये भितीयुक्त वातावरण आहे.
अन्वर सुलेमान शेख (50) यांनी रहमानी मदरशा समोर फरशी पाडा सेक्टर 34 ए, खारघर येथे 1 लाख रुपये किंमतीची बजाज कंपनीची टु स्ट्रोक काळ्या-पिवळ्या रंगाची रिक्षा क्र.एमएच-46-एझेड-2110 ही उभी ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर रिक्षा चोरुन नेल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.