८०% समाजकारण २०% राजकारण या सूत्रानुसार सेनेचा समाजकारणाचा धडाका.
चंद्रशेखर सोमण यांच्या पाठपुराव्याने नवीन पनवेल उड्डाणपुलाच्या रस्त्याची दुरुस्ती…!
पनवेल – नवीन पनवेल ला आपसात जोडणारा उड्डाणपूल हा एक महत्वाचा मार्ग आहे. रोजच्या रोज हजारो वाहनांची ये जा या उड्डाणपुलावरून होत असते. तेथील महामार्ग आता आणखी रुंद करण्यात आल्याने तेथील रोजची वाहनांची संख्या ही आता प्रचंड वाढली आहे. परंतु उड्डाणपुलाच्या सुरवातीलाच (पनवेल हुन न्यू पनवेल ला जाणाऱ्या दिशेला व न्यू पनवेल कडून पनवेल या येणाऱ्या दिशेला अशा दोन्ही मार्गिकांवर) खूप मोठे खड्डे पडले आहेत. अनेकदा सिग्नल सुटल्यावर भरधाव वेगाने वाहने ब्रिजवर चढण्यासाठी सुरवात करतात. पण या खड्यांमुळे अनेकदा टू व्हीलर त्यात अडखळून पडतात. ४ चारचाकी वाहने खड्यात आपटून किंवा जोरदार आपटण्याच्या भीतीने जोरात ब्रेक चा वापर करता…