कामोठे येथे स्कुटीची चोरी
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः कामोठे वसाहतीमधील सेक्टर 18 हरिओम कॉम्प्लेक्स समोरील रस्त्यावर उभी करून ठेवलेली 25 हजार रुपये किंमतीची सुझुकी लेटस स्कुटी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
सत्येंद्र जितेंद्र सिंग यांनी त्यांची 25 हजार रुपये किंमतीची स्कुटी क्र.एमएच-46-एटी-2231 ही चावी गाडीलाच लावून पार्क करून ठेवली असताना अज्ञात चोरट्यांनी सदर गाडी चोरुन नेली आहे. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार संजय पाटील करीत आहेत.
