भारत विकास परिषदेद्वारे बालिका सप्ताह उपक्रमाचे आयोजन
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः भारत विकास परिषदे द्वारे देशभर बालिका सप्ताह उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. भारत विकास परिषद संपूर्ण भारतात कार्यरत असलेली एक सामाजिक संस्था आहे. संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण या पंचसूत्री नुसार सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे विविध उपक्रम देखील देशभरात आयोजित केले जातात.
याच अनुषंगाने ऍनिमिया-मुक्त भारत’, बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या दोन अभियाना अंतर्गत मुलींच्या शिक्षण आणि आरोग्य या विषयात काम करीत आहोत. राष्ट्रीय ’कन्या दिना’ निमित्त 17 जानेवारी ते 24 जानेवारी 2021 रोजी भारत विकास परिषदेतर्फे महिला व बाल विकास आयामा अंतर्गत ’बालिका सप्ताहा चे आयोजन करण्यात येत आहे. या आठवड्यात भारत विकास परिषदेच्या सर्व शाखा, देशभरात सर्वत्…
