टेम्पो ट्रेलर व मोटार सायकलमधील विचित्र अपघातात 1 ठार 5 जखमी
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः पनवेल जवळील जुना पुणे-मुंबई महामार्गावरील मनोज ढाब्यासमोर भिंगारवाडी येथे आज पहाटे 7.30 च्या सुमारास टेम्पो, ट्रेलर व मोटार सायकल यांच्या झालेल्या अपघातात एक ठार तर 4 जखमी झाले आहेत.
मोटार सायकलवरील फिर्यादी एडविन लुईस फर्नांडीस (20 रा.बांद्रा) हा त्याच्या ताब्यातील मोटार सायकल घेवून जुना पुणे-मुंबई महामार्गाने पुण्याच्या दिशेने जात असताना भिंगारवाडी गावाच्या पुढे मनोज ढाब्याच्या समोर तो आला असताना ट्रेलर क्र.एमएच-46-एएफ-3556 वरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रेलर नादुरुस्त असल्याने रस्त्यावर उभा केल्याने पाठीमागून येणार्या टेम्पो क्र.एमएच-12-आरएन-1515 वरील चालक आरोपी बाळू भोंडवे याने त्याच्या ताब्यातील टेम्पो रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून ट्रे…