डिझेल चोरी प्रकरणी 4 आरोपी गजाआड ; 20,19,900 रुपयाचा माल केला हस्तगत
पनवेल, दि.16 (संजय कदम) ः पनवेल परिसरात जबरी चोरी करून रोख रक्कम व डिझेल चोरी केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 गुन्हे उघडकीस आणले असून जवळपास 20,19,900/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
पनवेल परिसरात काही दिवसापासून डिझेल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. या प्रकरणी पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहा.पो.आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व पोनि गुन्हे संजय जोशी यांच्यासह गुन्हेप्रकटीकरण पथकाचे सपोनि देवळे ,पो उप निरी सुनिल तारमळे, पोहवा विजय आयरे, पोहवा वाघमारे , पोना परेश म्हात्रे , पोशि सुनिल गर्दनमारे ,पोशी यादवराव घुले, पोना युवराज राऊत ,पोशी विवेक पारासूर ,पोशी राजू खेडकर , पोना वि…