पत्रकार मिलिंद खारपाटील यांची वावरले शाळेला पुस्तके भेट
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः वडिल आदर्श शिक्षक कै गजानन गणू खारपाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पत्रकार मिलिंद खारपाटील यांनी वावरले शाळेला 4400 रुपये किमतीची 17 पुस्तके भेट दिली.
वाचून झालेले पुस्तक घरात राहण्यापेक्षा ग्रंथालयाला दिले तर किमान 100 वाचक वाचू शकतील असे मिलिंद खारपाटील यांनी सांगितले. वाचाल तर वाचाल हा संदेश त्यांनी या वेळी दिला. गेल्या 5 वर्षात त्यांनी 1 लाखाहून आधिक किमतीची पुस्तके विविध ग्रंथालयाला दिली आहेत.त्यांच्या या समाजोपयोगी कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यावेळी वावरले शाळेतील शीतलकुमार म्हात्रे, दरेकर आदी शिक्षक उपस्थित होते.
फोटो ः पत्रकार खारपाटील यांच्या मार्फत शाळेला पुस्तकांची भेट