पनवेल शहरातील परदेशी आळी परिसरात राहणारीतरुणी बेपत्ता
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील परदेशी आळी परिसरात राहणारी एक तरुणी राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
करुणा अजित शेखाटे असे या तरुणीचे नाव असून रंग गव्हाळ, उंची 5 फूट, केस कुरळे व लांब, चेहरा लांब, नाक सरळ आहे. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पोलीस हवालदार सुरेश थोरात यांच्याशी संपर्क साधावा.