खारघर आणि परिसरातील हवा प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडत आहे.- महापौर डॉ. कविता चौतमोल
पनवेल : प्रतिनिधी :-खारघर येथील हवा प्रदूषणाचे प्रमाण गंभीर असल्याची चिंता डॉ. कविता चैतमल, पनवेल महानगरपालिका यांनी व्यक्त केली. खराब होत असलेल्या हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्यासाठी स्टेअरिंग समिती गठीत करण्यास पुढाकार घेणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. स्वच्छ आणि मोकळा श्वास घेण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांना एकत्र यावे असे आव्हान महापौरांनी केले. वातावरण फाऊंडेशनतर्फे उत्सव चौक, खारघर सेकटर ७ येथे ‘श्वास घेणाऱ्या’ कृत्रिम फुफुसांची (लंग्जबिलबोर्ड) स्थापना करण्यात आलेल्या ‘स्वच्छ हवा सर्वांसाठी’ या उपक्रमांतर्गत शनिवारी बोलत होत्या.
नुकतेच हवा प्रदूषणासंदर्भात वातावरण फाउंडेशनने संशोधनपर अभ्यास केला. या संशोधन याअभ्यासाअंती समोर आलेल्या माहितीनुसार खारघर-तळोजा-पनवेल येथील रहिवासी दिवसभरात १७ तास प्रदूषित हवेत श्वास घेत असल्याचे व विशेषतः सकाळी सहा ते आठ या वेळेत पीएम २.५ (पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट) कणांची पातळी सर्वाधिक नोंदवली गेली असल्याचे समोर आले आहे. मानवी आरोग्यावर दुषित हवेचा काय परिणाम होत आहे.
वायू प्रदूषणामुळे केवळ खारघरच नाही तर तळोजा आणि पनवेल या परिसरांतील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. या भागातील वाढत्या हवा प्रदूषणाचे प्रमाण लक्षात घेता या भागासाठी ‘स्वच्छ हवा कृती आराखडा’ तयार करण्यासंदर्संदर्भात मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीपीबी) बैठक आयोजित करण्यासाठी पत्र लिहिणार आहे.” असे महापौरडॉ. कविता चौतमोल म्हणाल्या.
त्याच बरोबर स्थानिक प्रशासक व लोकप्रतिनिधी आणि तज्ञ मंडळी यांच्या समवेत स्टेअरिंग कमिटीची स्थापना करण्याची गरज असल्याचे हि त्या म्हणाल्या. “या भागातील वाढत्या हवा प्रदूषणाच्या कारणांचा शोध घेऊन त्यावरील उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. तसेच पनवेल महानगरपालिका आणि एमपीसीबी यांच्यावतीने हवा प्रदूषणाच्या माणकांचे उल्लंघन करणाऱ्या एमआयडीसी-तळोजा येथील कंपनीवर त्वरित कार्यवाही करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.” याचबरोबर स्थानिक नागरिकांनी कमी अंतराच्या पल्ल्यासाठी चारचाकी वाहनांचा उपयोग न करता चालत जाने किंवा सायकलिंगचा उपयोग करवा असेही त्यांनी यावेळी म्हटले.
उभारण्यात आलेल्या लंग्जबिलबोर्ड फिल्टर मीडिया पासून तयार केले असून ते शुभ्र पांढऱ्या रंगाचे आहेत. या बिलबोर्डला मागे ‘बाहेर हवा फेकणारे पंखे’ (exhaust fan) बसवण्यात आले आहेत. जशी मानवी श्वसनाची प्रक्रिया काम करते तसेच हे बिलबोर्ड काम करत आहेत. या बिलबोर्डवर एक हवेची गुणवत्ता तपासणारे यंत्र (रिअल-टाईम एअर क्वालिटी मॉनिटर) बसवण्यात आले आहे. जे प्रत्येक क्षणाची हवेची गुणवत्ता दर्शवते. महिन्याभरात ही शुभ्र पांढऱ्या रंगाची फुफुसे हळूहळू काळी पडत जातील त्यानुसार संबंधित परिसरातील हवा किती खराब आणि अशुद्ध आहे त्याबद्दल नागरिकांना समजेल. हे बिलबोर्ड लावण्याचा उद्देश म्हणजे लोकांच्या आरोग्यावर, त्यांच्या फुफुसांवर हवा प्रदूषणाचा काय दुष्परिणाम होत आहे हे दृश्य स्वरुपात दाखवण्यासाठीचा प्रयोग आहे
भगवान केसभट, संस्थापक वातावरण फाउंडेशन – हवा प्रदुषणाचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतो या विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी श्वास घेणारी फुफुसे (बिलबोर्ड ) हे योग्य मध्यम आहे. जेंव्हा आम्ही बंदरे बांद्रा येथे याची स्थापना केली होती तेंव्हा ते १४ दिवसांनी पूर्णतः काळे झाले होते परंतु, खारघर येथे स्थापन केलील्या फुफुसांचा एकाच दिवसात रंग बदलण्याची सुरुवात झालेचे दिसून आले आहे. असे हि ते म्हणाले.
केसभट यांच्या मते सोशिअल मिडीयाचा उपयोग करून स्तापित केलेल्या श्वास घेणाऱ्या फुफुसांना आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच नागरिकांनी या उपक्रमाला भेट द्यावी, त्यासोबत फोटो घ्यावे आणि आमच्या सोशिअल मिडिया माध्यमावर आम्हाला टँग करावे असेही आवाहन आम्ही करत आहोत. याबरोबरच खारघर-तळोजा-पनवेल या पट्ट्यातील वाढत्या हवा प्रदूषणाबद्दल लोकप्रतिनिधींनीही भूमिका घ्यावी, आवाज उठवावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
याचा बरोबर वातावरण संस्थेने पनवेल शहरासाठी ‘स्वतंत्र स्वच्छ हवा कृती आरखडा’ तयार करण्याबरोबरच हवेची गुणवत्ता मोजणारी रिअल टाईम मॉनिटरिंग स्टेशन्सची उभारणी करण्याची सूचना केली आहे.