महिलेच्या दागिन्यांची चोरी
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील जुने भाजी मार्केट येथे हात रुमाल खरेदी करत असताना त्यांच्या संमतीशिवाय लबाडीने त्यांच्याकडे असलेल्या दागिन्यांची ज्याची किंमत जवळपास 6 लाख 10 हजार रुपये इतकी आहे चोरी केल्याची घटना घडली आहे.
पार्वती उलवेकर (48) या अशोक रेडीमेंड स्टोअर्स जुने भाजी मार्केट वडाच्या झाडाखाली या कपड्याच्या दुकानात हातरुमाल खरेदी करीत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून तो पसार झाला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.