गुन्हे शाखा कक्ष 2ची मटका जुगार खेळणाऱ्यावर धडक कारवाई
पनवेल दि.२०(वार्ताहर) बेकायदेशीर रित्या मटका जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यांवर गुन्हे शाखा कक्ष 2 आणि पनवेल शहर पोलिसांनी धडक कारवाई करून सहा जणांना ताब्यात घेतले असून या गुन्ह्यात वापरलेली रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि इतर साहित्य असा मिळून एकूण 2 लाख 61 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.
शहरातील सोसायटी नाका गांधी हॉस्पिटल समोरील उड्डाणपुलाखाली बेकायदेशीर रित्या मटका जुगार खेळले जात असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. आर.ढोले व त्यांच्या पथकाने छापा टाकून मुख्य आरोपी कन्हैय्या गर्जे यांच्यासह इतर सहा जणांना या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कि. प्रो.को.कलम 41 (1) (अ) अन्वये कारवाई केली आहे.…