घरफोडी रोख रक्कमेसह दागिने लंपास
पनवेल दि.२०(वार्ताहर) एका बंद घरात अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत रोख रक्कमेसह दागिने लंपास झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
शहरातील लाईन आळी मधील शिवकृपा अपार्टमेंट येथे राहणाऱ्या सुरेखा भेंडे यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मिळून जवळपास १५हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.