रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरी
पनवेल दि.२०(वार्ताहर) तालुक्यातील उसरली
खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरी झाल्याची घटना घडली आहे.
उसरली खुर्द येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता तिसरी व पाचवी या वर्गातील बंद कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून वर्गात असलेले दोन प्रोजेक्टर व एक लॅपटॉप चोरून नेले आहेत.त्याची किंमत जवळपास ६५ हजार आहे. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.