आकार वार्षिकांक प्रकाशन सोहळा संपन्न,ज्येष्ठ पार्श्वगायक विनय मांडके यांना ‘जीवन गौरव’
मुंबई (प्रतिनिधी),आकार क्रिएशन या प्रसिद्ध प्रकाशन आणि जाहिरात संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आकार जीवन उत्सव या कार्यक्रमात काल रविवार १७ जानेवारी रोजी आकार वार्षिकांक मान्यवरांच्या हस्ते बोरिवली (प),गोखले कॉलेज समोरील
डायमंड सभाग्रुहात प्रकाशित करण्यात आला, या कार्यक्रमात दरवर्षी देण्यात येणारे ‘आकार गौरव’ पुरस्कारही प्रदान करण्यात आले.
ज्येष्ठ पार्श्वगायक विनय मांडके यांना ‘जीवन गौरव’ ,
प्रसिद्ध तालवादक अनुपम घटक यांना ‘कला गौरव’
तर बीकेसी कोविद सेंटरचे डीन डॉ. राजेश डेरे यांना ‘समाज गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बोरिवली येथे पार पडलेल्या या भव्य आणि दिमाखदार सोहळ्यास खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, प्रख्यात कामगार नेते अभिजित राणे आदी मान्यवर उपस्थित होते.