कंटेनरच्या धडकेने इसम जखमी
पनवेल दि.२१(वार्ताहर) एका भरधाव कंटेनरने पादचारी इसमास धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर इसम जखमी झाला आहे.
पनवेल जवळील कसलखंड येथे नवकार लॉजीस्टिक या ठिकाणी सत्यवान शिंदे हे लघुशंकेसाठी गाडीच्या उजव्या बाजूने उतरत असताना तेथून जात असल्याने कंटेनरच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन घाईघाईने चालवून सत्यवान शिंदे यास धडक दिली व त्यामध्ये ते जखमी झाले. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.