शेळ्यांमेंढ्याची बेकायदेशीर वाहतूक करणारयांवर गुन्हा दाखल
पनवेल दि.२१ (वार्ताहर) पनवेलजवळील मुंबईहुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस महामार्गावरून बेकायदेशीर रित्या शेळ्यांमेंढ्याना वाहनात क्षमतेपेक्षा जास्त भरून वाहतूक करणाऱ्या चौकडी विरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अशोक लेलँड ट्रकमध्ये आरोपी हुसेन अब्दुल शेख (वय ३५), मेहबूब सळुमिया शेख (वय ५५), कमरुद्दीन रियाजुदन पठाण (वय ५२) आणि फिरोज इमताहुसेन सय्यद (वय ३०) हे १८५ शेळ्यांमेंढ्याची वाहतुक करीत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा ट्रक ताब्यात घेतला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.