बस अपघातात एकाचा दुर्देवी मृत्यू
पनवेल दि 22(वार्ताहर) ट्रॅव्हल्स बस मागे घेत असताना झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर जाऊन झालेल्या अपघातात त्या इसमाचा दुर्देवी घटना तालुक्यातील आरिवली येथील मरीआई
धाब्याशेजारी घडली आहे.
ट्रॅव्हल बस चालक आरोपी अमर कर्मा सिंग वय 30 हा त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम एच बी जी 787 ही बस येथील पत्र्याच्या शेडमध्ये पाठीमागे घेऊन उभी करत असताना तेथे झोपलेल्या रामराव राठोड वय 33 ही व्यक्ती वाहन चालकाच्या निदर्शनास न आल्याने सदरची बसचे चाक त्याच्या अंगावर गेल्याने या घटनेत रामराव याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून वाहनचालक अमर सिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.